आदिवासी सांस्कृतिक एकता महासमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वाहानांना टोलमुक्त करा, आदीवासी संघटनेकडून निवेदनाद्वारे मागणी

बातमी कट्टा:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी ३२ वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन,पानखेडा(पिंपळनेर) येथे आयोजित करण्यात आला आहे.या संमेलनात संपूर्ण भारतातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. सदर कार्यक्रम दि.१३ जानेवारी २०२५ ते दि.१५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. धुळे जिल्यातील चार ही बाजूला टोल प्लाझा असल्याने त्या अनुषंगाने आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाला संपूर्ण भारतातील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोल मुक्त करावी अशी विनंती टोल प्लाझा व्यवस्थापक यांना भूषण मोरे(तालुका अध्यक्ष-एकलव्य प्रतिष्ठान, शिरपूर, मा.यशवंत पावरा( धुळे जिल्हा अध्यक्ष-अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटना,सखुबाई भील(सामाजिक कार्यकर्त्यां)देविदास भील, मनोज पवार(सरपंच, आमोदे), प्रदीप भील(टेक भीलाटी), प्रवीण सोनवणे,सुनील मोरे(मा. सरपंच,तांडे )अरुण सोनवणे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.संमेलनात येणाऱ्यांना टोलमाफी मिळावी यासाठी आमदार काशिराम पावरा यांनी देखील टोल कंपनींना लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: