महाराणा प्रतापसिंहजींचे वंशज  श्रीमंत राजे डाॅ. लक्ष्यराजसिंहजी मेवाड यांच्या हस्ते उपसरपंच सचिन राजपूत यांचा सन्मान

बातमी कट्टा:- सावळदे येथील उपसरपंच सचिन राजपूत यांची राजस्थान येथे महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे प्रदेश अध्यक्ष (युवा प्रकोष्ठ) महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती करण्यात आली.वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांचे वंशज तथा महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे राष्ट्रीय संरक्षक श्रीमंत राजे डाॅ. लक्ष्यराजसिंहजी मेवाड व चंद्रवीरसिंह नमाणा यांच्या हस्ते सचिन राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराज डॉ. लक्ष्यराजसिंहजी मेवाड तथा चंद्रवीरसिंह नमाणा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सावळदे सरपंच श्री. सचिन राजपूत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन “महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे प्रदेश अध्यक्ष (युवा प्रकोष्ठ) महाराष्ट्र राज्य पदाची जबाबदारी बहाल करत नियुक्ती पत्र दिले.डाॅ. लक्ष्यराजसिंह मेवाड यांनी सचिन राजपूत यांच्या कार्याचे कौतुक केले.

सावळदे येथील महाराणा प्रताप स्मारकाच्या अनावरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. लक्ष्यराजसिंह मेवाड यांना महाराणा प्रतिष्ठान सावळदे यांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.उपसरपंच सचिन राजपूत यांना महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे प्रदेश अध्यक्ष (युवा प्रकोष्ठ) महाराष्ट्र राज्य पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल सावळे गावांसह शिरपूर तालुक्यातून सचिन राजपूत यांचे स्वागत सत्कार करण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: