बातमी कट्टा:- घरफोडी करणाऱ्या संशयिताला पिंपळनेर पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याचांदीचे दागिन्यांसह ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोड्या झाल्याची घटनेत वाढ झाली होती.त्याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पथकाकडून शोध कार्य सुरु होते.यावेळी मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार नितीन ऊर्फ राजुभाई काळू पवार,रा.घोड्यामाळ इंदिरानगर पिंपळनेर, विक्की ऊर्फ विवेक अविनाश बच्छाव वय १९ वर्ष रा.इंदिरानगर पिंपळनेर, प्रथम ऊर्फ नानु अनिल नगरकर वय १८ वर्ष रा.नानाचौक पिंपळनेर यांच्या सोबत २ विधीसंघर्षग्रस्त बालक हे सदरचे घरफोड्या व चोरी करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती.
याबाबत पोलीसांनी प्रथम ऊर्फ नानु अनिल नगरकर वय १८,विक्की ऊर्फ विवेक अविनाश बच्छाव वय १९ वर्ष या दोघांना पोलीसांनी अटक करत नितीन ऊर्फ राजु काळु पवार हा फरार असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्याकडून सोने चांदीच्या दागिन्यांसह ७१ लाख ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हसंजय बारकुंड,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारीप्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे ,अशोक पवार, कांतिलाल अहिरे,प्रकाश मालचे, विजय पाटील, हेमंत पाटोळे, प्रदिप ठाकरे,पंकज वाघ, दावल सैंदाणे,नरेंद्र परदेशी, रविंद्र सुर्यवंशी आदींनी कारवाई केली आहे.


