बातमी कट्टा:- जम्मू काश्मीर भागात सेवा बजावत असतांना अतिबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे धुळे येथील मनोज गायकवाड यांना विरमरण आल्याची दुदैवी घटना घडली असून त्यांच्या सोबत आणखी दोन जवानांना विरमरण आले आहे.मनोज गायकवाड हे धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील रहिवासी होते.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
धुळे जिल्ह्यातील चिंचखेडा गावातील भारतीय सैनिक गायकवाड मनोज लक्ष्मण वय 42 हे गेल्या 21 वर्षांपासून सेवा बजावत असून सैन्यामध्ये मुळ युनिट मध्ये ५६ राष्ट्रीय रायफल जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असतांना दि १८ नोव्हेंबर २०२२ रोजी तेथील अतिबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे तेथे अडकले होते.त्यानंतर मनोज गायकवाड यांना हवामानाच्या दुष्परिणामामुळे होत असलेल्या शारीरिक त्रासामुळे तातडीने हवाईमार्गाने पुढील उपचाराकरीता १६८ सेना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते व तेव्हा त्यांना शारीरिक तपासणी नंतर मयत घोषित करण्यात आले.मनोज गायकवाड यांच्यासह आणखी सौविक हाजरा मुकेश कुमार विरमरण आले. सैनिक मनोज गायकवाद यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी,आई वडील व दोन भाऊ असा परिवार होत.