बातमी कट्टा:- दिवसभरातील दैनंदिन कामकाज आटोपून घरी येत असतांना चोरटे संशयितांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिर्ची पूड फेकून व्यापाऱ्याकडे असलेली 23 लाखांची रोकड लूटल्याची धकादायक घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील माधव कॉलनी परिसरामध्ये व्यापारी परेश पटेल यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 23 लाखांची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या जबरी रस्ता लुटीमुळे शहरात भितीचे वातावरण आहे.परेश पटेल हे आपलं दैनंदिन कामकाज आटोपून 23 लाखांची रोकडसह घरी आले. सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ते घरासमोर गाडी लावत असताना चार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करत डोळ्यात मिरची पूड टाकली.क्षणात पटेल यांच्या दुचाकीसह 23 लाखांची रोकड घेऊन चारही चोरटे पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली असून, प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. याबाबत रात्री उशिरापर्यंत आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.या जबरी रस्ता लुटीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.