#Breaking सामाजिक कार्यकर्त्या डॉ सरोज पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल…

बातमी कट्टा:- सामाजिक कार्यकर्त्या डॉ सरोज पाटील यांच्या विरुध्द अहिल्यापुर येथील उपसरपंच यांनी गुन्हा दाखल केला आहे. जून महिन्यात डॉ सरोज पाटील यांनी हुज्जत घालून शिवीगाळ करत धमकी दिल्याचे उपसरपंच संग्रामसिंग राजपूत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर येथील उपसरपंच संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत वय 63 यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले की अहिल्यापुर येथील पुण्श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पाय विहीरीच्या दुरुस्ती प्रकरणासाठी उपसरपंच संग्रामसिंग राजपूत व उखा साळवे हे मोटरसायकलीने फाईल घेऊन शिरपूर पंचायत समितीकडे जात असतांंना सामाजिक कार्यकर्त्या व जागृत मंचचे अध्यक्षा डॉ सरोज पाटील यांनी अहिल्यापुर उपसरपंच सग्रामसिंग राजपूत यांंना रस्त्यावर थांबवून गावात आमदार निधीतून झालेल्या काँक्रीट रोड आणि नाल्यावर पाईप मोरीचे कामाबाबत विचारणा करुन हे काम थांबवण्यास सांगितले.

सदरचे काम न थांबविल्यास अहिल्यापुर ग्रामपंचायत विरुध्द आर.टी.आय टाकण्याची धमकी दिली. तसेच सदरचा आर.टी.आय न टाकण्यासाठी वीस हजार रूपयांची खंडणी मागीतली.खंडणी देण्यास नकार दिल्याने हातातील फाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला तसेच हुज्जत घालून शिवीगाळ करुन पोलीसात खोटी तक्रार करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून शिरपूर शहर पोलीस स्टेशनात महिला सामाजिक कार्यकर्त्या डॉ सरोज पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या डॉ सरोज पाटील

गुन्हा दाखल करण्याआधी याबाबत चौकशी करणे गरजेचे होते.अचानक चार महिन्यानंतर गुन्हा का दाखल करण्यात आला. गुन्ह्यात तथ्य आढळले असते तर खुशाल गुन्हा दाखल केला असता.कुठलाही मुद्दा राहिला नाही तर पैसे मागितल्याचे बिनबुडाचे आरोप करत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या डॉ सरोज पाटील यांनी बातमी कट्टा सोबत बोलतांना सांगितले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: