Breaking news,तरुणाचा खून…

बातमी कट्टा:- शेतीच्या सपाटीकरणाच्या कामासाठी आलेल्या कामगाराचा शेतात मृतदेह आढळून आला आहे. डोक्याजवळ घाव घालून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून घटनास्थळी पोलीसांकडून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार सातारा जिल्ह्यातील शेती सपाटीकरणाचा व्यवसाय करणारे दोन युवक धुळे तालुक्यातील बोरकुंड भागातील रतनपुरा येथे शेती सपाटीकरणाच्या कामासाठी आले होते.त्यातील एकाचा शेतात एम एच 11 डी ए 1739 क्रमांकाच्या ट्रॅक्टर जवळ मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी आणि पोलीसांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे मृत व्यक्तीचे नाव आदर्श दत्तात्रय पिसाळ वय २३ रा. शेरेशिंदेवाडी जि.सातारा असे असल्याचे निष्पन्न झाले. कपळाजवळ घाव घातल्याने मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून पोलीस प्रशासनासह श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. खून कोणी केला याबाबत पोलीसांकडून शोध सुरु असून खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नसून उशीरापर्यंत कार्यवाही सुरु होती.

WhatsApp
Follow by Email
error: