बातमी कट्टा:- महाराष्ट्रहून गुजरातला जाणाऱ्या राज्यमार्ग सहावरील रंका नदीवरील पुल कोसळल्याची घटना आज दि 29 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.या रस्त्यावरील गुजरातकडे जाणारी वाहतूक वळवली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग सहा वरील धानोरा गावाजवळ असलेल्या रंका नदीवरील बांधण्यात आलेला पुल कोसळला असून सकाळी नऊ वाजण्याचा सुमारास अचानक हा पूल कोसळला मात्र पुलावर वाहने नसल्याने मोठी दुर्घटना घटना टळली आहे.हा पुल 40-45 वर्ष जुने आहेत.या पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते का ? गुजरातला जोडणारा महत्वपूर्ण मार्ग असल्याने या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
धानोरा मार्गावरील वाहतूक वळविणेबाबत
धानोरा जवळील रंका नदीवरील पुल आज सकाळी तुटल्यामुळे यामार्गावरील वाहतुक मोठ्या वाहनासाठी निझर मार्गे तर लहान वाहनासाठी धानोरा गावातुन वळविण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
0000