
बातमी कट्टा:- धुळे येथे चोरांनी सराफाच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली असून तब्बल एक कोटी 10 लाखांची चोरी झाल्याचे दुकान मालकाकडून सांगण्यात येत असले तरी अद्याप चोरीची ठोस माहिती मिळालेली नाही. चोरीचा संपूर्ण प्रकार सिसिटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला आहे.याबाबत उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.सिसिटीव्हीत एकुण तीन चोरट्यांनी चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या स्वर्ण पॅलेस या सराफाच्या दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे.दुकानातून 1 कोटी 10 लाखांची चोरी झाल्याचे सराफ दुकान मालकाकडून सांगण्यात आले आहे. या सराफाच्या दुकानाच्या मागच्या बाजूने हे चोर आत शिरले.
तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे प्रथमदर्शनी सिसिटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे. चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केल्यानंतर काही सीसीटीव्ही कॅमेरे फोडलेले आहेत. आझाद नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.दुकानातील काचांची तोडफोड करण्यात आली आहे.सोने चांदी दागिन्यांच्या चोरीचा हा आकडा एक कोटी दहा लाखांपर्यंत असल्याचे सराफ मालक सरदार चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.