
बातमी कट्टा:- सबसे कातील गौतमी पाटीलचे वडील बेशुध्द स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. धुळ्यात नागरिकांना गौतमी पाटीलचे वडील बेशुध्द स्थितीत आढळले असून स्वराज फाऊंडेशन संस्थेने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

आपल्या तालावर श्रोत्यांना ठेका धरायला लावणाऱ्या आणि लाखोंची सुपारी घेऊन नृत्य करणाऱ्या गौतमी पाटीलचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यातील अजळकर नगर भागात बेशुध्द अवस्थेत नागरिकांना आढळून आले.दैयनिय अवस्थेत व्यक्ती असल्याने तेथील नागरिकांनी स्वराज फाऊंडेशन संस्थेला संपर्क साधला.स्वराज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रवींद्र पाटील यांना धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यानंतर सदर व्यक्तीचे नाव रवींद्र पाटील असून ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचे समजले.ही माहिती मिळताच नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले असून, गौतमी पाटील ने मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क केलेला नाही.रवींद्र पाटील यांची प्रकृती गंभीर असून हिरे मेडिकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.