#Video |निवडीनंतर काय म्हटले जिल्हा परिषद अध्यक्षा आणि उपाध्यक्ष..

व्हिडीओ बातमी

बातमी कट्टा:- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली यात भाजपने सत्ता कायम राखत धुळे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी अश्विनी पवार आणि उपाध्यक्ष पदी देवेंद्र पाटील यांची निवड झाली.

व्हिडीओ बातमी

धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदीची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.भाजपच्या उमेदवार अश्विनी पवार यांना 38 मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवसेना सदस्य सुनीता सोनवणे यांना 16 मते मिळाली.या निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवसेनेत मात्र फुट पडल्याचे दिसून आले असून शिवसेनेच्या चार पैकी दोन सदस्यांनी तटस्थ भुमिका घेतली आहे. या विरोधात शिवसैनिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. उपाध्यक्षपदी भाजपच्या देवेंद्र पाटील यांची निवड झाली असून, त्यांना 38 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार मोतनबाई पाटील यांचा पराभव झाला.भाजपच्या या विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

WhatsApp
Follow by Email
error: