बातमी कट्टा:- माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्यावरील दाखल झालेला गुन्हा खोटा असून तो गुन्हा मागे घ्यावा याबाबत शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाज व करणी सेना तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले नुसार विजयादशमी (दसरा ) या सणाच्या दिवशी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे रावण दहन वेळी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल व भाजपाचे ईतर पदाधिकारी यांच्यावर विरोधकांनी राजकीय वैमण्यस्यातून अॅट्रॉसिटी कायदा नुसार दाखल असलेला गुन्हा त्वरित रद्द करावा या आशयाचे निवेदन शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाज व करणी सेनाच्या वतीने शिरपूर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राजेंद्र राजपूत, नितीन राजपूत,राजसिंह देशमुख, देवेंद्र राजपूत,केवलसिंग राजपूत, नितीन राजपूत, महेंद्रसिंग राजपूत, माधवसिंग राजपूत, भरत राजपूत, राज सिसोदिया, अंबालाल राजपूत, प्रशांत राजपूत, धिरज राजपूत, सोनू राजपूत,गजु राजपूत, मयुर राजपूत, दिपक राजपूत पप्पु राजपूत,यांच्यासह इतर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.