Video धुळ्यात जलमय परिस्थिती, पावसाचा उद्रेक,काही घरांमध्ये पाणी,भात नदीला पूर…

व्हिडीओ बातमी

बातमी कट्टा:- धुळे शहरासह तालुक्यात पावसाने कहर केला आहे.यात शहरातील सुशीनाला परिसर, देवपूर पलिसर,चित्तोड रोड परिसर योगेश्वर हाऊसिंग सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर,भरत नगर,केशर नगर,जय हिंद शाळा परिसरात रस्ता, चंद्रशेखर फेज भागात प्रचंड पाणी साचले आहे.या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली तर तालुक्यातील कापडणे देवभाने भागात देखील भात नदीला पूर परिस्थिती निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा आमदाळ फारुक शहा आणि आयुक्त देविदास टेकाळे यांनी पुर परिस्थितीची पाहणी केली आहे.शहरातील काही भागात धुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दोरीच्या साह्याने नागरिकांना घराबाहेर काढले.

On youtube

धुळे तालुक्यात 50 मिलीमीटर पेक्षा अधिक तर धुळे शहरात 41 मिली पाऊस पडल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत.यामुळे शहारालगत असलेल्या एसी.पी.एम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचा संपर्क तुटल्याने 400 विद्यार्थी आणि 200 रुग्ण अडकले होते. प्रशासनाने तात्काळ मदतकार्य करत त्यांना मदत पुरवली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तात्काळ विद्यार्थी आणि रुग्णांसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि डिझेलचा पुरवठा केला आहे. जनरेटरच्या मदतीने येथे विज पुरवठा करण्यात येत आहे. तर धुळे शहरातील देवपूर परिसरात सर्वाधिक पावसाचा अहाकार पाहाई मिळत आहे.

धुळे शहरातील सुशीनाला परिसरामध्ये अनेक घरांंना पाण्याने वेढा घातलेला आहे या नाल्याकाठी असलेली अनेक घर जलमय झाली आहे यातील अनेक घरे अतिक्रमित आहेत. चारही बाजूनी पाण्याचा वेढा असल्यामुळे या नागरिकांना घराबाहेर पडता आलेले नाही.

तालुक्यात पडलेल्या पावसाचा फटका या नवोदय विद्यायालाच्या सांकृतिक स्पर्धांनाही बसला आहे .गुजरात आणि महाराष्ट्रातील 16 संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत.या पावसामुळे कापूस ,मका,सोयाबीन या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: