Video शिक्षकांना कृतज्ञेतून अभिवादन! 12 शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

बातमी कट्टा:- गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग 12 वर्षांपासून अविरतपणे उपक्रमातून कुरखळी ग्राम सर्वांगिण विकास मंच, चिराईदेवी बहुद्देशीय सेवाभावी संस्था,अर्थे व गट साधन केंद्र,पंचायत समिती शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि 12 सप्टेंबर 2022 रोजी ‘ज्ञानदिपक आदर्श शिक्षक पुरस्कार” सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यात शहरी व ग्रामीण भागातील 12(बारा) शिक्षक आणि शिक्षीकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बघा व्हिडीओ

स्वर्गीय.दीपक मोरे (शिक्षक) व स्वर्गीय.निताबाई मोरे(शिक्षिका) ह्या कुरखळी गावातील शिक्षकांच्या कार्यास व त्यांच्या पावन स्मृतीस स्मरून ज्ञानदीपक आदर्श शिक्षक पुरस्कार हा महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल,शिरपूर येथील शिक्षक हेमंत कृष्णा शेटे,जि प शाळा बाळदे येथील अभिमान मंगा पाटील,आर सी पटेल, शिरपूरचे गजेंद्र पांढुरंग जाधव,
नगर पालिका शाळा क्र पाचचे शेख इम्रान शेख लुकमान,
KVTR शिरपूरचे निलेश जनार्दन चोपडे,महादेव आदिवासी माध्य. आश्रम शाळा, अनेर डॅम येथील हेमराज फकीरा अहिरे यांना प्रदान करण्यात आला.

On youtube

तर दुसरा ज्ञाननिता आदर्श शिक्षिका पुरस्कार ए आर पटेल CBSE, शिरपूर येथील उषा अशोक मनोरे यांना प्रदान करण्यात आला. व तिसरा पुरस्कार हा शिरपूर तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारे स्वर्गीय हिरामण कुंभार गुरुजी यांच्या नावे स्व.हिरामण कुंभार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जि प शाळा हाडाखेड, केंद्र सांगवीचे सुनंदा धनराज पवार , जि प शाळा जातोडा,केंद्र जातोडेचे रवींद्र मोतीराम पाटील, जि प शाळा टेम्भेपाडा,केंद्र बोराडी येथील यशवंत विनायक निकम यांना प्रदान करण्यात आला.तर चौथा पुरस्कार तालुक्यातील युवा तंत्रस्नेही शिक्षकांप्रती युवकांना प्रेरणा देणाऱ्या स्वर्गीय.गिरीष मोरे यांच्या स्मरणार्थ युवा तंत्रस्नेही आदर्श शिक्षक पुरस्कार हा जि प शाळा अर्थेचे प्रतिभा रमेश बारी वाठोडाचे गणेश वासुदेव सोनवणे यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगाचे औचित्य साधून वरील सर्व पुरस्कार हे पुढील वर्षांपासून ज्ञानदीप प्रतिष्ठान,कुरखळी या सेवाभावी संस्थेमार्फत वितरित करण्यात येणार आहेत असे ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर मोरे व सचिव मनोहर वाघ यांनी घोषित केले.तसेच कार्यक्रमा दरम्यान मोरे परिवाराकडून जि प शाळा कुरखळी येथे डायस भेट म्हणून देण्यात आले त्यावर स्व दीपक मोरे यांची प्रतिमा लावण्यात आली आहे.

Video

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ उमेश शर्मा,प्राचार्य.सारिकाताई रंधे,गटशिक्षणाधिकारी एफ के गायकवाड,शिक्षण विस्तार अधिकारी आर के गायकवाड डॉ निता सोनवणे,बि एस बुवा, मनीषा वानखेडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश मोरे यांसह मान्यवर उपस्थित होते.कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंचचे सदस्य, चिराईदेवी बहुद्देशीय संस्थेचे मनोहर पाटील व सदस्य, सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक शाळांचे मुख्याध्यापक, समग्र शिक्षा अभियानाचे सर्व कर्मचारी यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले तर, प्रास्ताविक मनोहर वाघ व आभार प्रदर्शन योगेश्वर मोरे यांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: