अंत्यसंस्कारासाठी जात असतांना अपघात, तीन महिलांचा मृत्यू 21 जण जखमी…

बातमी कट्टा :- अंत्यसंस्कारासाठी पिकअप वाहनाने जात असतांना भरधाव अवजड कंटेनरचा ताबा सुटल्याने कंटेनर पिकअप आणि जिपचा भीषण अपघात झाला.यात पिकअप मधील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले आहेत.हा अपघात ईतका भीषण होता की यात कंटेनर आणि पिकअप दोन्ही वाहनांच्या समोरील अक्षरशः चक्काचूर झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 1 डिसेंबर रोजी पारोळा तालुक्यातील बोळे येथून शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यसंस्कारासाठी पिकअप वाहनाने 22 जण जात होते.या दरम्यान विचखेडा फाट्याजवळ सकाळी 12 वाजेच्या सुमारास जीजे १२ बीडबल्यू ७२५४ क्रमांकाच्या कंटनेरचा ताबा सुटल्याने भरधाव कंटरने पिकअपला धडक दिली. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.यावेळी पिकअप मधील रेखाबाइ गणेश कोळी वय ५५,योगिता रवींद्र पाटील वय ४०,चंदनबाई गिरासे वय 65 सर्व राहणार बोळे ता.पारोळा यानचा जागीच मृत्यू झाला तर २१ जण गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच बोळे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

या अपघातात रणजीत सुरसिंग गिरासे (वय ६०), भरत रामभाऊ गिरासे (वय ६५), राजेशभाई कोळी (वय ४५), भीमकोर सत्तरसिंग गिरासे (वय ५०), भुराबाई मोहनसिंग गिरासे (वय ४०), भुराबाई तात्या गिरासे (वय ४०), रेखाबाई अधिकार गिरासे (वय ५०), नानाभाऊ सुभाष गिरासे (वय ५५), भटाबाई साहेबराव गिरासे (वय ४५),  सुनिता गिरासे (वय ४४), भुराबाई भीमसिंग गिरासे,  अजतसिंग दादाभाऊ गिरासे (वय ५०), सय्यद लियाकत (वय २१ रा. मालेगाव), हिराबाई विजयसिंह गिरासे (वय ४०), भीमकोरबाई जगत गिरासे (वय ६०), भगवानसिंग नवलसिंग गिरासे (वय ६५), रंजनसिंग भारतसिंग गिरासे (वय ५५), रुपसिंग नवलसिंग गिरासे (वय ६०), दयाबाई रूपसिंग गिरासे (वय ५५), राजेबाई साहेबराव कोळी (वय ४५) आदी जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: