बातमी कट्टा:- डाकीण असल्याचा संशय घेत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डाकीण बनुन जादूटोणा करत गावातील एकाला मारुन टाकल्याचा संशय घेत महिलेला मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सरसाणीचा हणवारीपाडा येथे कागद्या मदा पावरा,उदेसिंग वेरंघ्या पाडवी,निर्मल वेरंग्या पाडवी,विरसिंग कागदा पाडवी,रेमतीबाई वेरंग्या पाडवी यांनी पिडीत महिलेवर डाकीण असल्याचा संशय घेत मारहाण करत गावात राहशील तर ठार मारु अशी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
डाकीण असून जादूटोणा करुन गावतीलच वेरंग्या कागदा पाडवी यास मारुन टाकल्याचा संशय घेऊन पाचही जणांनी पिडीत महिलेला मारहाण करत गावत न राहण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.