अचानक पुर आल्याने दोन तरुण बेपत्ता…

बातमी कट्टा:- मासेमारीसाठी गेलेले असतांंना अचानक पुर आल्याने दोन तरुण पाण्याच्या प्रावाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्या दोघांचाही शोध घेण्यात आला असून ते अद्याप मिळुन आलेले नाही. याबाबत पोलीस स्टेशनात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील जांभीपाडा येथील गुरुदिप दिलीप पाडवी (वय 28) व गणेश मोतु पाडवी (वय 40) हे दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाचे सुमारास जांभीपाडा गावाजवळ असलेले नाल्याचे फर्शी पुलावर मासे पकडण्यासाठी गेले होते.त्या नाल्याच्या पाण्यात मासे पकडत असतांना नाल्यात पाण्याच्या अचानक प्रवाह वाढल्याने ते दोघे पाण्याच्या प्रवाह सोबत वाहु लागले तेव्हा खबर देणारं हे त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरले त्यावेळी आकाश दिलीप पाडवी हा सुध्दा त्यांचे सोबत वाहू लागला परंतु त्याला इतर लोकांनी काठीच्या साह्याने बाहेर काढून वाचविले. मात्र गुरुदिप पाडवी व गणेश पाडवी हे त्या पाण्यात वाहून गेले त्यांचा शोध घेण्यात आला.

याबाबत आकाश दिलीप पाडवी यांनी दिली खबरवरून उपनगर पोलीस स्टेशनात मिसिंग नोंद करण्यात आली आहे. मिसिंग व्यक्तींमिळून आल्यास उपनगर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.याप्रकरणी पुढील तपास असई केशव मिठ्या गावीत करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: