अतिवृष्टीतील भरपाईसाठी  नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे सरकारचे आदेश -आ. कुणाल पाटील

बातमी कट्टा:- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व वित्तहानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी पुन्हा दिल्या असून पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचाही इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा व  मालमत्तेच्या नुकसानीचा अहवाल शासनाने मागवला असल्याचेही आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असून नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. आ. कुणाल पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विंचूर, शिरुड, बोरकुंड परिसरातील शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.


       याबाबत सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण धुळे तालुक्यासह शिरूड, बोरकुंड, बोरी परीसरात अतिवृष्टीमुळे  झाल्यामुळे खरिपातील सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.  शेतांमध्ये पाणी साचून कपाशी, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कडधान्य आदी खरीप पिके सडू लागलेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने आमदार कुणाल पाटील यांनी शुक्रवार दि.10 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांसोबत शिरुड, बोरकुंड आणि बोरी परिसरात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली यावेळी नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आ.कुणाल पाटील यांनी धीर देत सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यासाठी झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना पुरेपूर मोबदला दिला जाईल. तसेच अनेक ठिकाणी घरांचीही पडझड होऊन रहिवाशांच्या निवाऱ्यासह संसार उपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतीपिकांसह घरांची पडझड व इतर वित्त हानीचा टाळाटाळ न करता संबंधित कर्मचाऱ्यांनी इत्यंभूत माहिती गोळा करून नुकसानीचा कोणतीही दिरंगाई न करता तातडीने पंचनामा करावा आणि याबाबत, तलाठी यांना यावेळी दिल्या. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी, रहिवासी पंचनामापासून वंचित राहणार नाही यासाठी महाविकास आघाडी शासनाने पंचनाम्याचा  सविस्तर तपशील मागविला असून सर्व नुकसानग्रस्तांना पूर्णपणे नुकसानीचा मोबदला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ. कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले. नुकसानीच्या पाहणी दरम्यान आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी व्ही.आर.प्रकाश, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, माजी प.स. सभापती बाजीराव पाटील, माजी जि. प. सदस्य साहेबराव खैरनार, बाजार समितीचे प्रशासक रितेश पाटील, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, संचालक बापू खैरनार, विंचूर येथील ज्येष्ठ नेते शिवाजी बोरसे, जनार्दन देसले, रतनपुरा सरपंच पोपटराव माळी, भैय्या पटेल, शिरूडचे माजी उपसरपंच आबा शिंदे, एकनाथ देवरे, राजू पवार, रमेश शिंदे,ॲड. बी.डी. पाटील, आबा पाटील, अशोक बोरसे, भाऊसाहेब देसले, सुभाष बोरसे, दगडू माळी, पप्पू भदाणे, दशरथ बोरसे, सुनील चौधरी, प्रभाकर माळी,विलास पाटील यांच्यासह शेतकरी, कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: