
बातमी कट्टा:- आयुष्यभर कुटुंबापासून दुरावलेल्या त्या महिलेला अमरधामच्या छायेतच कायमची विश्रांती मिळाली.दि 18 फेब्रुवारीला दुपारी त्या महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला.वारसांची शोधा शोध केली आणि आयुष्य संपल्यावर तीचे नशीबाचे बेवारसीपण अखेर संपले.
भिक्षा मागणाऱ्या महिलेचा रस्त्यालगत मृतदेह आढळून आल्याची घटना दि 18 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.सदर महिलेला मृत अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.शिरपूर शहादा रोडवरील तालुक्यातील वाघाडी गावापुढे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला.मृत महिला नेमकी कोण ? याची उशीरापर्यंत ओळख पटत नव्हती मृत महिला वाघाडी ते शिरपूर परिसरात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होती अशी माहिती पोलीसांना मिळाली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाघाडीचे पोलीस पाटील अमोल पवार घटनास्थळी दाखल होत सदर मृत महिलेला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.या मृतदेहाची चौकशी करण्यात आली.मृत महिलेचे नाव कोणालाही माहित नाही. आयुष्य भर कुटुंबापासून दुरावलेला त्या महिलेला अखेर अमरधामच्या छायेतच कायमची विश्रांती मिळाली.
