बातमी कट्टा:- गणेश उत्सवात व गणेश विसर्जनात रात्रंदिवस तत्पर राहून ऑन ड्यूटी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनातील गणेश विसर्जन केले यावेळी सर्व ताण आणि थकवा विसरून पोलीस मनसोक्त गाण्यांवर थिरकले.
शिरपूर तालुक्यासह शहरात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली तब्बल 10 दिवस डोळ्यात तेल घालून अहोरात्र बंदोबस्त साभाळत पोलीसांनी कर्तव्य बजावले.गणेशोत्सव विसर्जन निर्विघ्न पार पडल्यानंतर तालुक्यातील व शहरातील गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी शिरपूर शहर पोलीस स्टेशनातील गणेशाचे विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व ताण व थकवा विसरून पोलीस मनसोक्त थिरकले.