अपघाताची बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराचाच अपघात,

बातमी कट्टा:- पत्रकार जिव धोक्यात घालून आपली पत्रकारीता करत असतो त्याचेच आणखी एक प्रत्यय समोर आले आहे. मोटरसायकलीने आपल्या गावी जात असतांना अचानक रस्त्यावर अपघात घडल्याचे दिसले अपघाताची बातमी घेऊन मदतकार्य केल्यानंतर पत्रकार मोटरसायकलीवर बसतांनाच समोरून येणाऱ्या भरधाव टँकरने मोटरसायकलीला जोरदार धडक दिली.सुदैवाने या पत्रकाराने प्रसंगावधानाने दुचाकींवरून उडी घेतल्याने जिवीतहानी टळली मात्र मोटरसायकलीचा चुराडा झाला आहे.

काल दि 24 रोजी रात्री 8:15 वाजेच्या दरम्यान पत्रकार भिका चव्हाण हे आपल्या मोटारसायकलीने शिरपूर येथून तऱ्हाड कसबे या आपल्या गावी जात असतांना भामपूर फाट्याजवळ शिरपूर येथील डॉ.काझी हे शहादा कडून शिरपूर कडे दुचाकीने येत असतांना रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची दुचाकी पडल्याने त्यांचा अपघात झाल्याचे दिसले त्यांनी तात्काळ मदतकार्य करीत जखमी डॉक्टरांला एका वाहनात बसवून शिरपूर कडे उपचारासाठी रवाना केले दरम्यान अपघाताची बातमी घेतली.आणि बातमी घेऊन पुन्हा 8:42 च्या सुमारास स्वतः च्या दुचाकी क्रं एम एच 18 बीपी 4218 या मोटारसायकलीवर बसत असतांनाच समोरुन येणाऱ्या अज्ञात टँकरने जोरदार धडक दिली सुदैवाने पत्रकार भिका चव्हाण यांनी तात्काळ लांब उडी घेतल्याने जिवीतहानी टळली.मात्र यावेळी मोटरसाकलीचे नुकसान झाले. अपघाताची बातमी कव्हर करतांना अपघात होऊन पत्रकार भिका चव्हाण यांच्या अपघाताची बातमी बनली.

WhatsApp
Follow by Email
error: