अपघातात महिलेचा मृत्यू…

बातमी कट्टा:- डोक्यावर चारा घेऊन पायी जाणाऱ्या महिलेला भरधाव येणाऱ्या आयशर वाहनाने समोरुन धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी आयशर चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आयशर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर शिवारातील हॉटेल अन्नपूर्णा जवळ दि ३१ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गुरांसाठी जंगलातुन डोक्यावर चारा घेऊन चारणपाडा पळासनेर येथे आपल्या घरी परत पयी जात असतांना मालुबाई नागराज चारण या महिलेला सेंधवा कडून शिरपूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या डी डी ०१ एफ.९३८३ आयशरने समोरून धडक दिली यात महिलेच्या डोख्याला जबर मार लागला.उपस्थितांनी मालुबाई यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मालुबाई यांचा मृत्यू झाला आहे.आयशर चालक फरहान अली शराफत आली वय २५ रा रेजिमेंट बाजार महु जिल्हा इंदौर,मध्यप्रदेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: