बातमी कट्टा :- पहाटेच्या सुमारास पायी जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 34 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दि 24 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील स्वामी रेडियम दुकाना जवळ दि 24 रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील वरवाडे भागात राहणारे कैलास निंबा माळी वय 34 हे पायी जात असतांना अज्ञात वाहनाने कैलास माळी यांना धडक दिली.त्यांना त्यांचे भाऊ विलास निंबा माळी यांनी उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉ शशिकांत पाटील यांनी तपासून कैलास माळी यांना मृत घोषीत केले.मयत कैलास माळी हे शिरपूर बसस्थानक जवळील हॉटेलात कामाला होते.