अपयशी प्रेमविवाहाचा अंत, प्रेम, प्रेमविवाह आणि “गळफास”, १४ दिवसाच्या बाळाला सोडून आईची आत्महत्या

बातमी कट्टा :- प्रेम हे आंधळ असत हे आपण अनेकदा ऐकले आहे. याबाबत अनेक किस्से देखील आपण बघितले आहेत. बऱ्याचदा ज्या व्यक्तीवर प्रेम केले त्याच व्यक्तीसोबत लग्न व्हावं यासाठी तरुण तरुणी जिवाचं रानं करत असतात. परंतू हे सर्वांचे प्रेम शेवटपर्यंत टीकेलच असं नाही.अशाच पध्दतीने अपयशी प्रेम विवाहाचा अंत शिरपूरात झाला आहे.दुर्देवी बाब अशी की या प्रेमविवाहाच्या प्रकरणात १४ दिवसाच्या बाळाला सोडून आईने जगाचा निरोप घेतला आहे.

दि २२ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास शिरपूर येथील क्रांतीनंगर भागात अंजली विशाल सोनवणे या महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेतल्याची घटना घडली होती.या घटनेची माहिती मिळताच क्रांतीनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र अंजली सोनवणे यांनी गळफास घेण्यापूर्वी घराच्या लोखंडी दरवाजा आतून बंद केला होता.घटनेची माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप दरवडे व शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या समक्ष नागरिकांच्या मदतीने दवाजाची आतून कडी खोलण्यात आली.घरात प्रवेश केला तेव्हा अंजली सोनवणे यांचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.पोलिसांनी चौकशी करुन अंजली सोनवणे यांचा मृतदेह खाली उतरवून नातेवाईक आणि उपस्थितांच्या मदतीने मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

मृत अंजली हे गुजरात येथील सुरत शहरात आपल्या आई वडीलांसोबत राहत होते.अंजली एका ज्वेलरीच्या दुकानात कामाला होते ते राहत असलेल्या बिल्डिंग मध्येच शिरपूर येथील विशाल प्रकाश सोनवणे हा देखील राहत होता.अंजली आणि विशाल या दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी अंजली आणि विशाल यांनी सुरत येथील न्यायालयात प्रेमविवाह केला होता. सहा महिन्यांपूर्वी अंजली आणि विशाल दोघेही शिरपूर येथे विशाल सोनवणे यांच्या आजी आजोबांसोबत घरी राहत होते. अंजली सोनवणे यांनी १४ दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला होता.मात्र दि २२ रोजी सायंकाळी अंजली सोनवणे यांनी आपल्या बाळाला आजी बाबा कडे सोडून घराच्या वरच्या रुम मध्ये जाऊन गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. अंजली सोनवणे यांनी आत्महत्या का केली ? नेमकं पती पत्नी असे काय घडले ? १४ दिवसाच्या पोटच्या मुलाला सोडून इतका मोठा टोकाचा पाऊल का उचलला ? याबाबत एकना अनेक प्रश्न उपस्थित झाले.

आज पहाटे मृत अंजली सोनवणे यांची आई वडील भाऊ यांनी शिरपूर गाठले.शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात मृत अंजलीला बघून आई वडीलांनी आक्रोश व्यक्त केला.पती विशाल सोनवणेच्या त्रासाला कंटाळूनच अंजलीने आत्महत्या केल्याचे अंजलीच्या आई वडीलांकडून सांगण्यात येत होते. शिरपूर शहर पोलिस स्टेशनात अंजली सोनवणे यांच्या आईने फिर्याद दाखल केली असून विशाल सोनवणे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल सोनवणे दारु पिऊन अंजली सोनवणे यांना मानसिक व शारीरिक त्रास देत होता.आत्महत्येच्या एक दिवसाआधी अंजली सोनवणे यांनी “मुझे या अच्छा नहीं लगराहा है मम्मी” असा मॅसेज केला होता.विशाल सोनवणे दारु पिऊन त्रास देत असल्याने अंजली सोनवणे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून शिरपूर पोलिसांनी विशाल सोनवणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.१४ दिवसांपूर्वी बाळाला जन्म देऊन अंजली सोनवणे यांनी जगाचा निरोप घेतला.वर्षभरापुर्वी झालेला हा अपयशी प्रेमविवाहाचा आज अंत झाला.

WhatsApp
Follow by Email
error: