बातमी कट्टा:- शेतात काम करत असतांना अचानक तब्बल नऊ फुट लांबीचा अजगर दिसल्याने शेतकऱ्याला घाम सुटला.शेतकऱ्याची धावपळ उडाली.सर्प मित्रांनी तो 9 फुट लांबीच्या अजगरला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी अजगराला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
शिरपूर तालुक्यातील उप्परपींड येथील शेतकरी दिलीप धोदा राजपूत हे आपल्या गावाजवळील शेतात काम करत होते. यावेळी त्यांना अचानक मोठा अजगर दिसला त्यांनी तात्काळ याबाबत गावातील नागरिकांना माहिती दिली.याबाबत सर्प मित्र अभिजित पाटील यांना माहिती दिली.घटनास्थळी शेतातील झाडेझुडपांमध्ये होता. या अजगराला काढण्यासाठी सर्प मित्र अभिजीत पाटील,दिपक पाटील,महेंद्र कोळी यांनी मोठया कसरतीने अजगराला बाहेर काढले. अंदाजे 9 फुट लांब असलेल्या अजगराला बघण्यासाठी यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.