बातमी कट्टा:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान तोतया अधिकारी म्हणून ताफ्यात फिरणाऱ्या हेमंत पवार याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. सदर संशयित हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथील असून घटनेची माहिती मिळताच हेमंत पवार यांच्या आई आणि वडीलांना अश्रु अनावर झाले.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा होता या दौऱ्यादरम्यान अधिकारी म्हणून ईसम कोट घालुन घुसखोरी करत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांंना मिळाल्याने सदर इसमाला पोलीसांनी ताब्यात घेतले असता तो स्वताला आंध्रप्रदेश खासदाराचा स्विय्य साहाय्यक असल्याचे सांगत होता मात्र त्याच्या गळ्यातील ओळपत्र तपासणी केली असता ते केंद्रीय गृहविभागाचे दिसून आले.पोलीसांनी तात्काळ त्याची चौकशी सुरु केली असता तो व्यक्ती धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथील असून हेमंत बन्सीलाल पवार असे त्याचे नाव उघड झाले.पोलीसांनी हेमंत पवार याला ताब्यात घेतले असून या घटनेची उत्तस्तरीय तपासणी सुरु करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दाऊळ येथे राहणारे पवार यांच्या आई-वडिलांना त्याच्या कामाबद्दल कुठेही माहिती नसल्याच समोर आले आहे.चॅनलवर सुरु असलेल्या बातम्या बघून त्यांना घटनेची माहिती कळल्याचे सांगीतले. हेमंत पवार त्याचे वडील निवृत्त पोस्टमन असून, आता ते शेती करीत आहेत.चौकशी करून त्याला लवकर सोडण्यात यावे अशी मागणी आई वडीलांनी केली आहे. यावेळी पवार कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.हेमंत पवार तेथे कशासाठी गेला होता.याबाबत अधिक चौकशी सुरु आहे.