अर्चना पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड…

बातमी कट्टा:- धुळे- मुकटी ता.जि.धुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी आज दि. 24 नोव्हेंबर रोजी मुकटी ग्रा.प. कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मुकटी ग्रामपंचायत चे एकूण 17 सदस्य आहेत.  17 पैकी  2 रिक्त जागा पोटनिवडणुक प्रस्तावित आहेत. सरपंच निवड प्रसंगी 15 पैकी 12 सदस्य उपस्थित  होते, तर 3 सदस्य अनुपस्थित होते.

सरपंच पदासाठी मुकटी ग्रा.पं. सदस्या सौ.अर्चना उमाकांत पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अध्यासी अधिकारी श्री श्रीकांत एन देसले यांनी सौ.अर्चना उमाकांत पाटील यांना बिनविरोध विजयी घोषित केले. मुकटी माजी सरपंच व धुळे तालुका पत्रकार संघाचे सहसचिव उमाकांत पाटील यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. उमाकांत पाटील यांनी यापूर्वी दोन वेळ मुकटीचे सरपंच पद उत्तमरित्या भूषविले आहे.

जवाहर गटाचे धुळे बाजारसमिती सभापती रितेश पाटील, माजी.जि.प. सदस्य विशाल सैंदाणे, माजी.पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, चतुर सैंदाणे, सदस्य एकनाथ सैंदाणे, माजी पं. स.सदस्य भगवान चौधरी, प्रदीप सैंदाणे, योगीराज सैंदाणे, प्राचार्य  नानाभाऊ देवरे,रवींद्र सैंदाणे, ज्ञानेश्वर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामविकास अधिकारी एस एस वाघ, तलाठी जितेंद्र बांगर, प्रभारी सरपंच ललिता सैंदाणे ग्रा.पं सदस्य एकनाथ सैंदाणे, सुदाम पाटील, माजी जि.प सदस्य विशाल पाटील, ग्रा. प सदस्य एकनाथ सैंदाणे माजी पं स सदस्य भगवान चौधरी,प्रभारी सरपंच ललिता सैंदाणेभरत पाटील, दिनेश पाटील, अशोक पारधी, अंजनाबाई पाटील, प्रतिभा चौधरी, बेबाबाई पाटील, भिकुबाई पाटील, आक्काबाई भिल यांचे सह ग्रामपंचायतीचे आजी, माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार कुणालबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुकटी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल राहील असे नवनियुक्त सरपंच अर्चना उमाकांत पाटील यांनी सांगितले.

WhatsApp
Follow by Email
error: