बातमी कट्टा:- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला मा. न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे. 2015 साली 22 वर्षीय संशयिताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धुळे तालुक्यातील कापडणे येथे दि 26 जानेवारी 2015 रोजी लग्नसमारंभातील अल्पवयीन मुलीला फुस लावून घरी घेऊन जात तीचा विनभंग केला.पिडीत मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर सोनगीर पोलीस स्टेशनात कापडणे येथील समाधान राजेंद्र माळी वय 22 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.सा.पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करत संशयिताविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.या प्रकरणी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या.त्यांची साक्ष गृहीत धरुन संशयित समाधान माळी याला दोषी ठरवण्यात आले.त्याला 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नीलेश कलाल,विशेष सरकारी वकील अजय सानप यांनी कामकाज पाहिले.या प्रकरणी त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी मार्गदर्शन केले.