बातमी कट्टा:- शिरपूरात चोरांनी अक्षरशः हैदोस घातला असून घरफोडी, चैन स्नाचिंग सारख्या घटना घडत आहेत. यातच आता बसस्थानक येथे बसमध्ये चढत असतांना महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखला करण्यात आला आहे.बसस्थानकात पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक असतांना देखील अशा पध्दतीने चोरीची घटना घडत असल्याने शहरात चोरांनी हिम्मत वाढल्याचे यातून सिध्द होत आहे. मात्र चोरांची हिम्मत कोणामुळे वाढतय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरपूर शहरात वेगवेगळ्या पध्दतीने वाढत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. शिरपूर शहरातील बसस्थानकात दररोज एक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक केलेली असते.मात्र तरी देखील दि 1 रोजी सायंकाळी शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनात वंदना गोपाल बारी रा.धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,वंदना बारी या त्यांच्या भाचाच्या लग्नासाठी शिरपूर येथे आल्या होत्या.लग्न कार्यक्रमा नंतर दि 1 रोजी त्या सायंकाळी धुळे जाण्यासाठी नणंद सोबत बसस्थानकात आल्या.सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास धुळे बसमध्ये गर्दीमुळे वर चढत असतांंना बसमधून त्यांच्या काळ्या रंगाच्या पर्स मधून 51 हजार किंमतीचे 17 ग्रँम सोन्याची शॉर्ट पोत,15 हजार 900 किंमतीचे सोन्याचे कानातले,4.30 ग्राम वजनाचे 12 हजार किंमतीचे सोन्याचे काप असा एकुण 78 हजार 900 रूपये किंमतीचे सोने चोरी झाल्याचे वंदना बारी यांना लक्षात आले.या घटनेनंतर पोलीसांना माहिती देण्यात आली व पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला.