
बातमी कट्टा:- एकीकडे निसर्ग साथ देत नसतांना अवकाळी पाऊसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि त्यातच अज्ञात माथेफिरूंनी चक्क ६ ते ७ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले.तोडणीला आलेली पपई,केळीसह शेतातील पाईपलाईन माथेफिरूंनी तोडून नुकसान केले.
शिरपूर तालुक्यातील शिंगावे शिवारात शिंगावे आणि हिंगोणी गावादरम्यान नेहमी प्रमाणे शेतकरी शेतात गेले तेव्हा त्यांना पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यात अज्ञात माथेफीरुने कोयता किंवा कुऱ्हाडीच्या साह्याने पिकांचे व पाईपलाईनचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
या नुकसानीत शिंगावे येथील मधुकर फकिरा पाटील, प्रकाश सदा पाटील,सतीष भावराव पाटील,दगडू भुदा पाटील, अभिमन परशुराम पाटील,संजय निंबा पाटील आदी शेतकऱ्यांचे केळी,पपई व त्यासोबत पाईपलाईनचे नुकसान केले आहे.
कुठल्याही चोरीच्या उद्देशाने हे नुकसान करण्यात आले नसून फक्त शेतकऱ्याचे नुकसान व्हावे यापध्दतीने उभ्या पिकांवर घाव घालण्यात आले आहे.शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला असून अवकाळी पाऊस व त्यानंतर अशा पध्दतीने माथेफिरू मुळे झालेले शेतातील पिकांच्या नुकसानी मुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी हिंगोणी व शिंगावे शिवारातील शेतकऱ्यांनी शेतात गर्दी करत भविष्यात ईतर शेतकऱ्यांचे देखील अशा पध्दतीने नुकसान होईल अशी चिंता यावेळी व्यक्त केली.