बातमी कट्टा:- विहीरीतून पाणी काढत असतांना पाय घसरून विहीरीत पडलेल्या आईला वाचविण्यासाठी गेलेल्या मुलाचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्यी दुर्दैवी घटना काल दि 9 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.
जळगांव:- मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 9 रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी पंढरीनाथ पाटील यांचे गावाजवळ शेत आहे. दि 9 रोजी प्रतिभा पंढरीनाथ पाटील व मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील हे शेतात फवारणी च्या कामासाठी गेले होते.फवारणी पंपासाठी पाणी लागणार असल्याने आई प्रतिभाबाई पंढरीनाथ पाटील या विहीरीतून पाणी काढण्यासाठी गेल्या मात्र तोल गेल्याने प्रतिभाबाई पाटील या विहीरीत पडल्या. आई वहिरीत पडल्याचे बघताच मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील याने आईला वाचविण्यासाठी विहीरीत उडी घेतली.
मात्र विहीरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दोघेही पाण्यात बुडाले.घटनेची माहिती गावात पसरताच गावातील नागरिकांनी विहीरीकडे धाव घेतली.तात्काळ पोहणाऱ्यांकडून दोघांचा शोध घेतला यात दोघांचाही दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला होता.दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.आई आणि मुलगा दोघांवर एकाचवेळी अंतुर्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.