बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील महाराज कॉम्प्लेक्स मध्ये रात्रीपासून उभ्या असलेल्या स्कोडा गाडीला शुक्रवारी सकाळी अचानक अज्ञात कारणाने आग लागली असून आगीत स्कोडा गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
याबाबत महाराजा कॉम्प्लेक्स मधील प्रत्यक्ष दर्शी यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार पप्पाजी थाली जवळ कॉम्प्लेक्स मधील काही दुकानदारांची वाहने कायम उभी असतात.त्या ठिकाणी एमएच-12 ईजी-8040 क्रमांकाची स्कोडा कंपनीची गाडी देखील उभी केलेली होती. दरम्यान सदर वाहनाला शुक्रवारी सकाळी 8:30 – 9 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने दूर निघू लागला आग लागल्याचे लक्षात येतांना नागरिकांनी घाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न करीत अग्निशमन दलाला माहिती दिली. तत्काळ अग्निशमन दलाचे वाहन दाखल होत आग आटोक्यात आणली मात्र या काळात सर्व वाहन संपूर्ण जळून खाक झाली.
घटनास्थळी भिंतीला लागून कचरा मोठ्या प्रमाणावर साचला असून त्या कचऱ्यामुळे आग लागून वाहनाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अद्याप वाहन मालकाने पोलिसात खबर दिली नसल्याने कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.