आपत्कालीन परस्थितीत सर्वांसाठी देवदुत ठरणारे धुळे एसडीआरएफ पथकातील तीन जवान शहीद

बातमी कट्टा :- लोकांसाठी नेहमीच देवदुत ठरणारे धुळे एसडीआरएफ पथकातील तीन जवान आपले कर्तव्य बजावत असतांना शहीद झाले आहेत.नगर जिल्ह्यात नदीत बचाव कार्य दरम्यान दुर्दैवी घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नगर जिल्ह्यातीव अकोला तालुका येथील सुगाव बु.येथे प्रवरा नदी पत्रात दोन मुले बुडाली असून त्यांचा शोध व बचाव कार्यासाठी धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ )पथकातील जवणांची तुकडी बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आली होती.

यावेळी कर्तव्यावार असतांना पाण्याच्या भोवर्यात बोट अडकून उलटल्याने धुळे एसडीआरएफ पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे रा.दौड ,राहुल गोपिंचद पावरा रा.शिरपूर व वैभव सुनिल वाघ रा.भडगाव हे तिन जवान जखमी झाले त्यांना उपचारासाठी हरिचंद्र बानकुळे हॉस्पिटल अकोले येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

WhatsApp
Follow by Email
error: