बातमी कट्टा:- आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ जितेंद्र ठाकूर यांना पालकमंत्री दादा भुसे साहेबांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
दि. 15/8/2022 स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे देशाच्या स्वातंत्र्याचा 75 व्या वर्धापन दिनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना धुळे जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्याबद्दल श्री सिद्धेश्वर हॉस्पिटलचे संचालक सुप्रसिद्ध आरोग्यदूत डॉ जितेंद्र ठाकूर यांना आरोग्य सेवेचा पुरस्कार देऊन पालकमंत्री मा. ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे कोविड काळात रुग्णांना देण्यात आलेली सेवा व त्यानंतर देखील सुरू असलेली वैद्यकीय सेवा याची दखल घेऊन धुळे जिल्ह्यात श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला प्रमाणपत्र देण्यात आले. यात प्रामुख्याने मागील काही महिन्यांपासून प्रत्येक तालुक्यात घेण्यात आलेले मेंदू, आणि मणक्यांच्या शस्त्रक्रिया चे तज्ञ डॉ अभिजित चंदनखेडे यांचे आरोग्य शिबर आणि त्या माध्यमातून रुग्णांचे मोफत उपचार, व आरोग्य योजनेत केलेल्या मोफत शत्रक्रिया, तसेच श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल मधे रुग्णावर डायलिसिस उपचार, किडणीचे उपचार, ऑपरेशन यांसह असंख्य अवघड शत्रक्रिया आरोग्य योजनेत करून शेकडो रुग्णांना मदत मिळवून देऊन जीवदान दिल्याच्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल चे संचालक डॉ जितेंद्र ठाकूर यांना पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित साक्रीचे आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जि. प अध्यक्ष डॉ तुषार रंधे, धुळेचे महापौर प्रदीप नाना कर्पे , जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी देखील डॉ जितेंद्र ठाकूर यांचे अभिनंदन केले .