बातमी कट्टा:- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव भाजपचे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार असतांना दिले गेले आहे.जे नावावरून भाजपावर आरोप करत आहेत ते त्यावेळी पाळण्यामध्ये होते.अशी टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ हे नाव मुळात भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या सरकारदरम्यान दिले गेले.त्याचे श्रेय प्रमोद महाजन यांना आहे.जे आज त्या नावावरून भाजप पक्षावर आरोप करत आहेत ते त्यावेळी पाळण्यामध्ये होते हे त्यांनी विसरु नये.मुळात प्रश्न असा आहे की,जिवीके कडुन अदानी एअरपोर्ट हस्तांतरणसाठी कॅबिनेट मध्ये ठराव मंजूर केला. ठाकरे सरकारने तो मंजूर करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान ,नाव कुठल्या अटी शर्ती असल्या पाहिजेत याचा निर्णय राज्य सरकारने करणे अपेक्षित होत.ठरावात याबाबत अटी शर्ती का टाकल्या नाहीत हा सवाल ठाकरे सरकार वर आहे असे यावेळी आशिष शेलार यांनी सांगितले.