बातमी कट्टा :- शेतातील पडित जागेत बघता बघता एक दोन नव्हे तर चक्क 12 मोरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.नेमक या मोरांच्या मृत्यू मागील ठोस कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी विषारी पदार्थ खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथील दादा राजपूत यांच्या पिडीत क्षेत्रात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोर मृत्यू मुखी असल्याचे दिसले.तेथेच बघितले असत एक दोन नव्हे तर चक्क 12 मोरांचा मृत्यू झाल्याचे समजले तर एका मोराची प्रकृती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. उपस्थितांनी या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकारींना दिली घटनास्थळी प्राणी मित्र योगेश वारुळे,अभिजीत पाटील,महेश करंकाळ आदी जण पोहचले.या मोरांना उपचारासाठी शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले.विषारी पदार्थ खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

या परिसरात मोरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.मात्र एकत्र 12 मोरांच्या मृत्यूची घटना एहिल्यांदा घडल्याने खळबळ उडाली आहे.
