बातमी कट्टा:- दि.६ जानेवारी २०२२ च्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी शिरपूर तालुक्यातील वाडी बसस्थानक व बाजार पट्ट्यातील सात दुकाने फोडून त्यातील काही रोकड व साहित्य चोरीस केले असून गावातील एक मोटर सायकल चोरीस गेली आहे.वाडी येथील प्रिंस बियर शॉपीचे कुलूप तोडून १२ किंग प्रेशर बियरचे बॉक्स व गल्यातील ५३०० रक्कम चोरून नेले आहेत.या सर्व चोऱ्या एका दिवशी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदरचे चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच शिरपूर येथील पोलीस कर्मचारी चौकशी करण्यासाठी दाखल झाले होते. दुकानाचे कुलूप तोडण्यासाठी टॅमी व सळईचा वापर करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
शिरपूर तालुक्यातील वाडी येथे एकाच रात्री सात दुकाने व एक मोटर चोरी झाल्याची घटना ग्रामीण भागातील ही पहिली घटना आहे यामुळे वाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यात दिनेश तिरमले यांचे दिनेश बूट हाऊस येथील दुकानाचे कुलूप तोडून ५३०० रुपये रोख काही चपला व बुटे चोरी गेलेली आहेत. तसेच दुसऱ्या चोरीत भरत भिल यांच्या प्रिन्स बियर शॉपीचे कुलूप तोडून १२ किंग फिशर बियरचे बॉक्स व गल्यातील ४७०० रोख रक्कम चोरांनी लंपास केलेली आहे, सद्गुरु नरेंद्र चौधरी यांचे सद्गुरु पान सेंटर मधील तीन हजार रुपये रोख व पंधराशे रुपयाचे किरकोळ साहित्य चोरीस गेलेले आढळून आले. नयन्तराम चौधरी यांच्या बालाजी किराणा दुकानातील स्टोअर रूम मधून साबण, निर्मा पावडर असे एकूण बारा हजार किमतीचे साहित्य चोरी गेले आहे. प्रभात पाटील यांच्या शिवनेरी फोटो स्टुडीओच्या गल्यातून २१०० रुपये चोरुन नेले.राकेश पाटील यांच्या शिवनेरी रेडिमेट कापड दुकानातून विविध कंपनीचे दहा हजार रुपयाचे रेडिमेट कापड चोरीला गेलेले आहेत. तसेच समाधान पाटील यांचे मार्कंडेश्वर पान सेंटर मधील आठशे रुपये रोख व पंधराशे रुपयाचे साहित्य चोरीस गेलेले आहेत. तसेच देवदास वाघ यानची मोटरसायकल बॉक्सर वाहन क्रमांक GJ. 19 .E .756 चोरीस गेलेली आहे.सदरचे संशयित हे चारचाकी व मोटारसायकलने आलेले असून काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले आहेत.