एसपी,विद्यार्थी अन् बारावी फेल…

बातमी कट्टा:- शिरपूर येथील नामांकित चित्रपट गृहात विद्यार्थ्यांनी आज दि 8 रोजी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यासह जिल्हा भरातील पोलीसांसोबत 12वी फेल या चित्रपटाचा आश्वाद घेतला.आएपीएस मनोजकुमार शर्मा यांच्यावर आधारित या चित्रपटात विद्यार्थ्यांना संघर्षमय प्रेरणादायी कहाणी बघायला मिळाली.

पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय अधिकारी सचिन हिरे,पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत सांगवी आश्रम शाळेचे विद्यार्थी आणि कन्या शाळेतील विद्यार्थीनी यांनी शिरपूर येथील सिटी प्राईड या नामांकित चित्रपट गृहात 12 वी फेल या दर्जेदार चित्रपटाचा अश्वाद घेतला.

प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन यशाला गवसनी घालता येते असा संदेश चित्रपटातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी हा उपक्रम राबवला. याबाबतचे नियोजन शिरपूर शहर पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर व त्यांच्या संपूर्ण पथकाने केले.या 12वी फेल चित्रपटात एका अयपीएस अधिकारीचा प्रेरणादायी प्रवास दाखविण्यात आला आहे.शिक्षण क्षेत्रात अपयशी झालेल्या लोकांना एक नवीन किक या चित्रपटातून मिळणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: