ऐ पब्लिक है साहब ,सब जानती है !!

बातमी कट्टा:- स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शिरपूरात सरास पणे सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई का होत नाही ? दुकानाच्या बाहेर बँनर किंवा फलक आले तर त्यावर तात्काळ कारावाईची तत्परता दाखवणाऱ्यांना शहराच्या चौफेर सुरु असलेला अवैध व्यवसाय दिसत नसणार का बरं ? यामुळेच याकडे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दखल घेण्याची गरज असल्याची अपेक्षा आता सर्व सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.शिरपूरात नव्याचे नऊ दिवस अवैध व्यवसाय बंद ठेऊन पुन्हा अवैध व्यवसायाचा बाजार कसा सुरु झाला हे सांगण्याची आवश्यकता नाही कारण “ऐ पब्लिक है साहब सब जानती है !” आपण सर्वच जण समजू शकतो.

स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शिरपूरची एज्युकेशन हब म्हणून देखील ओळख आहे.येथे शिक्षणासाठी विविध जिल्हा व राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र याच शिरपूरात अवैध व्यवसायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या बदली नंतर पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर विराजमान झाले.पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकरांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनची धुरा सांभाळताच शहरातील अवैध वाहतूक,शिरपूर शहरातील मेनरोड वरील बेशिस्त वाहतूक यांच्यासह शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उचलला होता.

या कारवाईमुळे अवैध व्यवसायधारकांचे धाबे दणाणले होते.आता शिरपूरात अवैध व्यवसायाला पुर्णता बंदी होईल अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत होती.मात्र काही दिवसांत शिरपूरात पुन्हा सर्वत्र अवैध व्यवसाय पध्दतशीर पणे सुरु झाले.आता प्रश्न असा उपस्थित होतो कि शिरपूरात बंद असलेले अवैध व्यवसाय सुरु कसे झाले ? ठरावीक दिवसानंतर अचानकपणे अवैध व्यवसाय सुरु होण्यामागे नेमके कोण ? अवैध व्यवसायाचा बाजार शिरपूरात पुन्हा कसा सुरु झाला ? हे सांगण्याची गरज नाही कारण ऐ पब्लिक हे साहब सब जानती है !! शिरपूरातील अशा अवैध व्यवसायांवर वचक बसणे अपेक्षित आहे आणि यासाठी धुळे पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

WhatsApp
Follow by Email
error: