बातमी कट्टा:- शिरपूर येथील निम्स कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी ऑडी कारने आलेल्या पालकांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.कार आणि टेम्पो वाहनाची जोरदार धडक झाल्याने अपघात झाला असुन यात सहा जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज 25 रोजी अंकलेश्वर येथे राहणारे शाह कुटुंब शिरपूर येथील निम्स कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीला घेण्यासाठी आले होते.ते मुलीला घेऊन जी.जे 21 ए क्यु 9839 क्रमांकाच्या ऑडी कारने अंकलेश्वरला जात असतांना दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील खांडबारा – नंदुरबार रस्त्यावरील वाटवी गावाजवळ बेकरीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि कारचा अपघात झाला.कार आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्याने दोन्ही वाहने चक्काचूर झाले.या अपघातात एकुण सहा जण जखमी झाले.उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.यात अंकलेश्वर येथील मुक्ती शहा हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर नंदुरबार येथे उपचार सुरु असून काहींवर खांडबारा येथे उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.पोलीस घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.