
बातमी कट्टा:- मुख्य बाजार पेठेतील कपडा दुकानातून लाखो रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. सुमारे 50 लाखांपेक्षा जास्तीची रोकड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 6 रोजी धुळे शहरातील आग्रा रोड वर मुख्य बाजारपेठेमध्ये 50 लाख रुपयांपेक्षा जास्तची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.येथील एका कापड व्यापाऱ्याकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे विभागाने कारवाई केली आहे.याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून निवडणूक आयोगाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. सदरची तपासणी आयकर विभागाकडून करण्यात येणार असून तोपर्यंत ताब्यात घेण्यात आलेली रोकड बँकेच्या ट्रेझरी मध्ये जप्त करण्यात येणार आहे.
