कर्तव्यदक्ष शिरपूर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची बदली…

बातमी कट्टा:- शिरपूर शहरासह तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना अचानक बदलीचे आदेशा आल्याने सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रत्येक गुन्ह्यातील सखोल तपास करून गुन्हेगारांना तात्काळ जेलबंद करणारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांछी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथून अचानक बदली करण्यात आली आहे.नुकतेच शिरपूर येथे मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर खूनाचा गुन्ह्यातील योग्यवेळी तपास चौकशी करून 5 संशयितांना शिताफीने अटक केरत तपास सुरु ठेवला होता.असे असतांना तालुक्यासह शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची बदली का झाली ? शहरात आता नगरपालिका निवडणूक येत असतांना शहरासाठी योग्य पोलीस निरीक्षक गरजेचा असतांना अचानक बदली झाल्याने सर्वांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: