बातमी कट्टा:- कांदा,कापूस ,लोखंडी सळई,मोटरसायकली चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांकडून 20 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यातील दोन संशयित सराईत असुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील साक्री व धुळे तालुक्यात शेती माल चोरीच्या अनेक घटना होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेतर्फे शोध घेणे सुरु असतांना साक्री तालुक्यातील सतिष छोटीराम गायकवाड व त्याचे काही साथीदार करत असल्याची माहिती मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे दि 16 रोजी सकाळी सतिष छोटीराम गायकवाड रा.चिंचपाडा ,ता.साक्री, विश्वास अशोक अहिरे रा.अनकवाडी ता.जि.धुळे या दोघांना धुळे शहरातील अकबर चौकात विना नंबर मोटरसायकलीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी लक्ष्मण काळु सुर्यवंशी रा. मु. तोरणकुडी,ता.साक्री, अनिकेत गंगाराम बहीराम रा.बोधगाव ता.साक्री व अण्णा श्रीराम गायकवाड रा.चिंचपाडा ता.साक्री यांच्या मदतीने कांदा,कापूस,लोखंडी सळई तसेच मोटरसायकली चोरी केली असल्याची कबुली देवुन त्यांचे ताब्यातुन 1 लाख 70 हजार 100 रुपये रोकड,1 लाख 55 हजार किंमतीच्या चार मोटरसायकली,45 हजार किंमतीचे 9 क्विंटल कापूस,50 हजार 124 रुपये किंमती बांधकामाचे स्टील ,27 हजार किंमतीच्या वेगवेगळ्या मोबाईल,16 लाख किंमतीच्या दोन टाटा एलपीटी 1109 आयशर असा एकुण 20 लाख 47 हजार 224 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक चौकशी केली असता सतिष छोटीराम गायकवाड व आण्णा ओंकार श्रीराम गायकवाड रा.चिंचपाडा ता.साक्री यांच्यावर इतर गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत,सपोनि प्रकाश पाटील, योगेश राऊत,श्रीकांत पाटील, प्रभाकार बैसाणे,संजय पाटील, प्रकाश सोनार,संदीप सरग,सुनिल पाटील, योगेश चव्हाण, मयुर पाटील,कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी,तुषार पारधी,महेंद्र सपकाळ आदींनी केली आहे.