कापूस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !!

व्हिडीओ बातमी

बातमी कट्टा:- शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या शेतातील गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेल्या कापसाची चोरी करणाऱ्या टोळीला साक्री पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ३० क्विंटल कापूस हस्तगत केला आहे.

बघा व्हिडीओ

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साक्री पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२२ साक्री अष्टाणे,कावठे,शेवाळी,आणि कासारे गाव परिसरात शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करुन गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कापुस चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता.नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री हद्दीतून दिलीप किशोर भिल रा.तलवाडे,सुरेश रामलाल माळीच रा.कोकले,जगदीश राजु माळचे,प्रमोद सुखदेव शिवदे ,सुनील बापु मरसाळे रा. कावठे आदींना ताब्यात घेतले होते. साक्री शहर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी साक्री तालुक्यातील अष्टाणे,कावठे,शेवाळी, आणि कासारे गाव परिसरात कापूस चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ४० रूपये किंमतीचा ३० क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला आहे.

On
WhatsApp
Follow by Email
error: