बातमी कट्टा:-नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्ती विरुध्द जनशक्ती होणार असून विजय होणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार एड शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे.धुळे शहरातील उर्दू शाळा क्रमांक आठ मधील मतदान केंद्रात सकाळी आठ वाजता शुभांगी पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या बोलतांना म्हटल्या की मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मालेगाव मार्गे संगमनेर येथे जाणार असून. ज्या ठिकाणी तांबे परिवाराचा बालेकिल्ला आहे, त्याच ठिकाणी जाण्याचा संकल्प शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे. विजय हा धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचाच होईल असेही त्यांनी यावेळी सांगित विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.