बातमी कट्टा:- प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा रेवाडी तालुका शिंदखेडा येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियाना अंतर्गत शाळेत व रेवाडी गावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी काढून ज्योतिबाराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
मुलींसाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे ग्रामस्थांना पटवून दिले एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते या संकल्पनेतून विविध घोषवाक्यात प्रभात फेरीत काढण्यात आली.या कार्यक्रमात सरपंच सिंधुताई पवार संस्थेचे अध्यक्ष सुंदरबाई रमेश मालचे संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्रजी रमेश मालचे. प्राथमिक मुख्याध्यापक श्री पवार सर माध्यमिक मुख्याध्यापक श्री पाटील,आशा सेविका, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .पी .जी.राऊळ यांनी केले तसेच आश्रमशाळेतील इयत्ता 5 वी ते 12वी च्या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणाद्वारे स्री शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले.त्यानंतर प्राथमिक शिक्षिका सौ. के. जी. सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी केलेले कार्य व त्या कार्याची आठवण ठेवून नवीन पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा असे मार्गदर्शनपर भाषण केले कार्यक्रमाचा समारोप पी. डी .पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानून केला. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.