
बातमी कट्टा:- काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती अशीच काहीशी घटना नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावात घडली आहे. शेतकरी कुटूंब घरात झोपलेले असतांना मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टशर्कीट मुळे घराला आग लागली.आवाज आल्याने कुटूंब बाहेर पळाल्यानंतर संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना आज दि १५ रोजी घडली.सुदैवाने या घटनेत जिवीतहानी टळली आहे.घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते सोमू भैय्यांनी भेट दिली असून आमदार विजयकुमार गावित यांना घटनेची माहिती कळवण्यात आली आहे.
बघा व्हिडिओ लिंक क्लिक करा https://youtube.com/shorts/r2pjoldRMsM?si=3N_qLTWAtYleJikb
नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथील शेतकरी गंगाराम मंगा भील हे आपल्या कुटूंबासोबत घरी झोपलेले असतांना आज दि १५ रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास घराजवळील इलेक्ट्रिक पोलवर शार्कसर्किट झाल्यामुळे घराच्या छतावर अचानक आग लागली. आवाज आल्याने झोपेत असलेले गंगाराम भील जागी होऊन घराबाहेर पळाले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी संपूर्ण गावकऱ्यांनी धाव घेत मदतकार्य केले मात्र शेतकरी गंगाराम भील यांच्या डोळ्यादेखत संपूर्ण घर जळून खाक झाले.
व्हिडिओसाठी लिंक क्लिक करा https://youtube.com/shorts/r2pjoldRMsM?si=3N_qLTWAtYleJikb
शेतकरी गंगाराम भील यांनी मोठ्या कष्टाने संसार उभा केला होता.या आगीत घरात साठवून ठेवलेला
15 क्विटंल कापूस,रब्बी हंगामातील 3 क्विंटल हरभरा, भुईमूग बियाणे, रासायनिक खते, इलेक्ट्रीक सुमारे 1 हजार फुट केबल,धान्य, कपडे, भांडी, पैसांसह, महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले आहे.या घटनेमुळे गंगाराम भील यांचे घर-संसार उघड्यावर आले आहे. शासन प्रशासनाने त्वरित पंचनामा करून या गरिब शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते सोमू भैय्या यांनी भेट दिली असून आमदार विजयकुमार गावित यांना घटनेची माहिती कळवली आहे.
व्हिडिओसाठी लिंक क्लिक करा https://youtube.com/shorts/r2pjoldRMsM?si=3N_qLTWAtYleJikb
