बातमी कट्टा:- धुळे शहरातील चक्करबर्डी परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाच्या संरक्षण भिंत कोसळल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने घटनास्थळी पाहणी करण्यात आली.यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की २० ते २५ दिवसापूर्वी काम पुर्ण करण्यात आलेल्या जलकुंभाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी ३० ते ३५ लाख रुपये खर्च करण्यात आलेले असतांना सरक्षण भिंत कोसळली कशी ? हा तर धुळेकर जनतेच्या पैशांची सरेआम लुट दिसत आहे. आयुक्तांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन ठेकेदार व संस्थेला हे काम देण्यात आलेले आहे. त्या ठेकेदाराला व संस्थेला काळ्या यादीत टाकावे व ज्या अधिकारीच्या निष्काळजीपणामुळे हे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे त्यांची चौकशी करुन निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.