कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…

बातमी कट्टा:- जंगलात 47 वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घातपात की अकस्मात मृत्यू याबाबत संशय व्यक करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 24 रोजी शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा येथील जंगल परिसरातील डोंगर भागात दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी तेथे जाऊन बघितले असता तेथे पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.याबाबत पोलीस पाटील जगदीश सुवालाल पावरा यांनी घटनास्थळी पाहणी केली असता तो मृतदेह डेबरा ऊर्फ भियान मुज्या पावरा वय 47 रा.देविंसिंगपाडा ह.मु.जामन्यापाडा ता.शिरपूर यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.घटनास्थळी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.डेबया पावरा याचा 3 ते 4 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.हा घातपात की अकस्मात मृत्यू याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: