बातमी कट्टा:– धुळे शहरात अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असतांनाच धुळे येथील मोहाडी उपनगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने काल दि १५ रोजी सायंकाळी आठ ते दहा जणांना चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करण्यात आला नाही तर आयुक्तांच्या दालनात भटक्या कुत्र्यांना सोडण्यात येईल असा गंभीर ईशारा धुळे मनपाला नगरसेवक राजेश पवार यांनी दिला आहे.
धुळे शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून महानगरपालिकेत वारंवार तक्रार करुनही महापालिकेकडून ठोस उपाययोजना होतांना दिसून येत नाही.काल दि १५ रोजी सायंकाळी शहरातील मोहाडी उपनगर भागात जयशंकर कॉलनी,वर्षावाडी,पिंपळादेवी नगर,वरचे गाव ,खालचे गाव परिसरात भटक्या कुत्र्याने आठ ते दहा लहान बालकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला.सर्व जखमी बालकांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखव करण्यात आले.यात एक मुलगा गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.घटनेनंतर नगरसेवक राजेश पवार यांनी रुग्णालयात बालकांची भेट घेत तात्काळ उपाययोजना करावा अन्यथा असा गंभीर ईशारा दिला आहे.